SBI Home Loan – Largest Property Expo In Pune Held On 23rd And 24th October At Mahalakshmi Lawns Karve Nagar

एसबीआय होम लोनतर्फे 23 आणि 24 ऑक्टोबर ला महालक्ष्मी लॉन्स, कर्वे नगर येथे पुण्यातील सर्वात मोठा प्रॉपर्टी एक्स्पो

गेल्या काही दिवसांपासून निवासी मालमत्ता बाजारपेठेत मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच निवासी मालमत्तांच्या वाढीसाठी रिअल इस्टेट डेव्हलपर्स एकत्र येऊन रोडमॅप विकसित करीत आहेत. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन त्यांचा खाजगीपणा जपणारी आणि त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन वैयक्तिक जागा आणि उत्तम सुविधा देण्यासाठी डेव्हलपर्स विविध उत्सवी ऑफर घेऊन येत आहेत.

वैयक्तिक जागा आणि उत्तम सुविधा, स्वतंत्र मजले, व्हिला आणि प्लॉट्स, तसेच वापरकर्त्यांना आणि गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी असलेल्या अपार्टमेंट्सची जोरदार मागणी आहे. त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे येथे ‘एसबीआय प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. हा एक्स्पो 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी लॉन्स, कर्वे नगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला असून याची वेळ सकाळी 10 ते रात्री 8 अशी आहे.

एसबीआयच्या प्रवक्त्यांनी या एक्स्पोबाबत माहिती देताना सांगितले, “पुण्यातील रिअल इस्टेट उद्योग ग्राहकांना गुंतवणुकीच्या संधी प्रदान करणारा आहे. तसेच घर खरेदीदारांना त्यांच्या स्वप्नातील मालमत्ता घेण्याची सुवर्ण संधी देणारा आहे. खरं तर, अनेक रिअल इस्टेट तज्ञ इच्छुक खरेदीदारांना त्वरित मालमत्ता खरेदी करता यावी यासाठी प्रयत्न करीत असतात. हीच बाब लक्षात ठेऊन एसबीआय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये  प्रत्येक ग्राहकाला त्याची गरज आणि त्याच्या जीवनशैलीला अनुरूप घरांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देणार आहे. चांगले विकासक आणि परवडणाऱ्या ईएमआयसह अनेक सुविधा या एक्स्पोमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एसबीआय नेहमीच ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचेही प्रवक्त्यांनी यावेळी सांगितले.

गृहविक्रीच्या बाजारातील अहवालांनुसार, भारतातील प्रमुख सात शहरांमध्ये घरांची विक्री 113% वर गेली आहे. आता कोरोनाची लाट ओसरत असल्याने आणि घर खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत असल्याने यात आणखी वाढ होईल असे म्हटले जात आहे.

‘एसबीआय प्रॉपर्टी एक्स्पो’मध्ये ग्राहकांच्या अपेक्षेनुसार खूप काही उपलब्ध करून दिले जाणार आहे. वर्क फ्रॉम होमसाठी मोठ्या, प्रशस्त घरांच्या मागणीची पूर्तता करणाऱ्या मालमत्ता या एक्स्पोमध्ये असणार आहेत. तसेच यासाठी ग्राहकांना परवडणारे व्याजदर देखील देऊ केले जाणार आहेत. एसबीआय गृहकर्जाची ऑफर प्लॉट आणि साइट खरेदी, घर बांधकाम, फ्लॅट किंवा रेडी-बिल्ट घर खरेदी, टॉप-अप कर्ज किंवा इतर बँक किंवा गृह वित्त कर्ज घेण्यावर आहे. यामुळे ग्राहकांना घर घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच यासाठी कोणतेही प्रक्रिया वा प्रशासकीय  शुल्क आकारण्यात येणार नाही. महिला कर्जदारांसाठी व्याजात सवलत, प्रीपेमेंटसाठी कोणताही दंड आकारण्यात येणार नाही आणि दैनंदिन कमी होणाऱ्या शिल्लक व्याजाची गणना इत्यादी सुविधा या एक्स्पोमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहक त्यांच्या CIBIL स्कोअरच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ आणि व्याज दर देखील घेऊ शकणार आहेत.

महाराष्ट्रात घर खरेदी करणाऱ्या महिलांनाही या आर्थिक वर्षापासून मुद्रांक शुल्कात कमी टक्केवारी द्यावी लागणार आहे.

SBI होम लोन स्टेट  बँकेच्या YONO प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.

CIBIL पात्रता तपासण्यासाठी आणि कर्ज कोटेशन मिळवण्यासाठी SBI च्या पुढील लिंकवर क्लिक करा आणि सर्व माहिती प्राप्त करून घ्या.

https://onlineapply.sbi.co.in/personal-banking/home-loan?se=SBI-Microsite&cp=Homeloan&Ag=SBI-Microsite


Random Photos

Pakkhi Hegde Turns Entrepreneur Launches Her Record Label Beyond Music... Posted by author icon admin Oct 1st, 2019 | Comments Off on Pakkhi Hegde Turns Entrepreneur Launches Her Record Label Beyond Music