एप्निलच्या शेवटच्या आठवड्यात नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओत कोविडनंतरचा काळ साजरा करण्यासाठी सांस्कृतिक महाउत्सवभारतरत्न लता मंगेशकर यांना वाहणार संगीतमय श्रद्धांजली

मुंबई- चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई एका नव्या उपक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. कर्जत येथील ५२ एकरमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण एनडी फिल्म स्टुडिओमध्ये महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि वारसा जगासमोर आणण्यासाठी एका महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाउत्सवात भारतरत्न लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

२८ एप्रिल ते १ मे दरम्यान आयोजित हा महाउत्सव नावाप्रमाणेच महाउत्सव असणार आहे. या महाउत्सवात कला, संस्कृती, नाटक, चित्रपट आणि खाद्यपदार्थांसोबतच कार्यशाळा, फॅशन शोचेही आयोजन करण्यात येणार आहे. हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, 1942 – अ लव्ह स्टोरी, जोधा अकबर, परिंदा, खामोशी अशा कल्ट चित्रपटांचे कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांची दोन दशकांहून अधिक काळ गाजलेली कारकीर्द आहे. अलिकडच्या काळातील स्लम़ॉग मिलेनियर- सच अ लआंग जर्नी आणि प्रेम रतन धन पायो हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यांचा हा इतिहास पाहाता या महाउत्सवात टिन्सेल टाऊनची चमक नक्कीच दिसेल यात शंका नाही. आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, सूरज आर. बडजात्या, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी अशा नामवंत आणि दिग्गज दिग्दर्शकांसोबत नितीन देसाई यांनी काम केलेले आहे.एनडी स्टुडियोतील महाउत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला दिलेली उजळणी आहे. कोविड नंतरच्या युगाचे स्वागत करण्यासाठी अशा रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सगळ्यांनीच साक्षीदार होणे आवश्यक वाटते.

एप्निलच्या शेवटच्या आठवड्यात नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओत कोविडनंतरचा काळ साजरा करण्यासाठी सांस्कृतिक महाउत्सवभारतरत्न लता मंगेशकर यांना वाहणार संगीतमय श्रद्धांजली


Random Photos

An Acid Attack Case – Music & Trailer Launched... Posted by author icon admin Feb 4th, 2020 | Comments Off on An Acid Attack Case – Music & Trailer Launched